किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांना डायलिसीससाठी लागणारी औषधे करमुक्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांना डायलिसीससाठी लागणारी औषधे करमुक्त

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 30 Dec 2015   
किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना डायलिसीससाठी लागणारी औषधे करमुक्त
करण्याचे आश्वासन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 2015-16 च्या अर्थसंकल्पीय
चर्चेदरम्यान दिले होते. त्याची पूर्तता करत आज श्री. मुनगंटीवार यांनी अशा रुग्णांना
उपचारार्थ लागणाऱ्या 13 जेनेरिक औषध तसेच उपकरणांना विविध करातून मुक्त करण्याचा
निर्णय घेतला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून डायलिसीस संदर्भातील औषधांची आणि उपकरणांची यादी
विक्रीकर विभागाकडून मागविण्यात आली होती. त्यानंतर विक्रीकर विभागाने पडताळणी करून
ही यादी अंतिम केली आहे. डायलिसीससाठी लागणाऱ्या आणि करमुक्त झालेल्या औषधी आणि
उपकरणांची यादी मूल्यवर्धित कर कायद्याच्या अनुसूचित (12 ख) नोंद घेऊन अधिसूचित केली
जाईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages