महापालिकेच्या 'स्मार्ट' भरती प्रक्रियेचा 'इ-इंडिया' पुरस्काराने गौरव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिकेच्या 'स्मार्ट' भरती प्रक्रियेचा 'इ-इंडिया' पुरस्काराने गौरव

Share This
ऑनलाईन परीक्षेद्वारे ७१,८१६ उमेदवारांमधून ९४२ कर्मचा-यांची निवड
मुंबई / प्रतिनिधी - 
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे संपूर्णपणे ऑनलाईन पध्दतींचा वापर करीत राबविण्यात आलेल्या 'स्मार्टभरती प्रक्रियेला 'इ – इंडियाया राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहेकर्मचारी निवड प्रक्रियेसाठी संपूर्णपणे ऑनलाईन पध्दतीचा वापर करुन राबविण्यात आलेली 'स्मार्टभरती प्रक्रिया ही केवळ ०७ महिन्यात यशस्वीरीत्या व पारदर्शकपणे पूर्ण करणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिलीच महापालिका ठरली आहेयाच वैशिष्टयपूर्ण बाबीची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहेमुंबईतील ताज प्रेसिडेंट(विवांताया तारांकित हॉटेलमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या 'इ – इंडियाशिखर परिषदेच्या दिमाखदार सोहळ्यादरम्यान 'इ – इंडियाया पुरस्काराने गौरविण्यात आल्याने महापालिकेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.


एलेट्स टेक्नोमिडिया या संस्थेद्वारे प्रशासनात `-गव्हर्नमेंटचा अत्यंत प्रभावी व लोकापयोगी वापर करणा-या संस्थांना सन २००५ पासून दरवर्षी `-इंडियापुरस्कारांनी गौरविण्यात येतेयाच अंतर्गत या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये बृहन्मुंबई महापालिकेने राबविलेल्या `स्मार्टभरतीप्रक्रियेचा गौरव करण्यात आला आहेमहापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन उपायुक्त किरण आचरेकर यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेली 'स्मार्टभरती प्रक्रिया मार्च – २०१४ ते सप्टेंबर – २०१४ या दरम्यान म्हणजेच केवळ सात महिन्यात पूर्ण झाली होतीया भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्यासाठी अर्ज करणेसंबंधित शुल्क भरणेराज्यातील १४ केंद्रांवर लेखी परीक्षा व टंकलेखन चाचणी एकाच वेळी घेणेपरीक्षण करणे व अंतिम निकाल यादी जाहीर करणे आदी सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली होतीया भरती प्रक्रियेमध्ये एकूण ७१,८१६ उमेदवारांनी सहभाग नोंदविला होतायामधून अंतिमत९४२ उमेदवारांची लिपिकीय पदांसाठी निवड करण्यात आली होती२ मार्च २०१४ :- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागातील ९४२ लिपिकांची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात महापालिकेच्याwww.mcgm.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages