मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 30 Dec 2015
मुंबई कोस्टल रोडला परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानले आहेत. कोस्टल रोड हे मुंबईकरांचे स्वप्न आहे ते आता लवकरच पुर्ण होईल असेही त्यांनी नमुद केल आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटनुसार केंद्राकडून कोस्टल रोडला जरी ग्रीन सिग्नल मिळाला असला तरी त्यात काही सुधारणा करण्याची गरज असल्याच दिसते आहे. या रोडमुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे. यापूर्वीच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला ग्रीन सिग्नल दिलेला आहे.
नरिमन पॉइंट येथून सुरू होणारा कोस्टल रोड ३५ ते ३६ किलोमीटरचा असून, तो कांदिवलीला जाऊन मिळणार आहे. त्यासाठी सुमारे १० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे शहरातील १८ ठिकाणी उपनगरातील मार्गावर जाण्यासाठी रस्ते तयार होणार आहेत, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र कोस्टल रोडमुळे पर्यावरणाची हानी होणार असून, त्याचा फटका कोळीवाड्यांना बसणार आहे, असा प्रतिवाद तज्ज्ञांनी केला आहे.
No comments:
Post a Comment