स्मार्ट सिटीची संकल्पना घटनेने स्वराज्य संस्थांना दिलेल्या अधिकारांवर गंडांतर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्मार्ट सिटीची संकल्पना घटनेने स्वराज्य संस्थांना दिलेल्या अधिकारांवर गंडांतर

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 30 Dec 2015   
स्मार्ट सिटीची संकल्पना ही घटनेने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या अधिकारांवर गंडांतर असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज केली. महापालिकांचे अधिकार हाती घेण्याचा हा डाव असल्याचे ते पत्रकार परिषदेत म्हणाले.

केंद्र सरकारला शहरांच्या विकासाची एवढीच कळकळ असेल, तर शहरांच्या विकासासाठी निधी द्यावा. उगाच महापालिकांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणे घटनाविरोधी ठरेल, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने राज्य सरकारला दुष्काळ निवारणासाठी दिलेले ३ हजार ५० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी राणे यांनी केली. घोषणांचा पाऊस पाडणारे मुख्यमंत्री एकाही घोषणेची धड अंमलबजावणी करीत नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages