२०१६ पावसाळा विषयक कृती आराखडा सादर करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 December 2015

२०१६ पावसाळा विषयक कृती आराखडा सादर करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश

वर्ष २०१६ च्या येणा-या पावसाळ्यात मुंबईकरांना पाऊस-पाणी संबंधित अडचणींचा त्रास होऊ नयेयासाठी गेल्या पावसाळ्यात आलेल्या अडचणींचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करुन सुयोग्य उपाययोजना अंमलात आणाव्याततसेच याकरिता आवश्यक तो कृती आराखडा पुढील १५ दिवसात सादर करावाअसे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महापालिकेच्या सर्व ७ परिमंडळांचे उपायुक्त व संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पयांना दिले आहेत.

वर्ष २०१६ च्या पावसाळ्याच्या अनुषंगाने पावसाळा पूर्वतयारी विषयक पहिली नियोजन बैठक आज (दि१८ डिसेंबर २०१५रोजी महापालिका मुख्यालयात संपन्न झालीया बैठकीदरम्यान सर्व परिमंडळीय उपायुक्तांनी त्यांना गेल्या पावसाळ्यात आलेल्या अडचणी,त्यांच्या क्षेत्रातील पाणी साचण्याची ठिकाणे व तत्सम बाबी याबाबत महापालिका आयुक्तांना माहिती दिलीत्यानंतर महापालिका आयुक्तांनी सदर अडचणी २०१६ च्या पावसाळ्यात उद्भवणार नाहीयासाठी काय करणे आवश्यक आहेयाबाबतचा संबधित कृती आराखडा पुढील १५ दिवसात सादर करावाअसे आदेश सर्व परिमंडळीय उपायुक्तांना दिलेतसेच अंमलबजावणीच्या अनुषंगाने काही अडचणी असल्यास त्याबाबत परिमंडळीय उपायुक्त यांनी पुढाकार घेऊन महापालिकेच्या संबंधित अधिका-यांसोबत संयुक्त पाहणी दौरे आयोजित करावेतअसेही आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

आज संपन्न झालेल्या पावसाळा पूर्वतयारी विषयक बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे एसव्हीआरश्रीनिवाससह आयुक्त उप आयुक्त (आपत्ती व्यवस्थापनशांताराम शिंदेसर्व सात परिमंडळांचे उपायुक्तसंचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पव प्रमुख अधिकारी (आपत्ती व्यवस्थापनउपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad