सहकारी हौसिंग सोसायट्यांच्या सदनिका हस्तांतरणाचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना- एकनाथराव खडसे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सहकारी हौसिंग सोसायट्यांच्या सदनिका हस्तांतरणाचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना- एकनाथराव खडसे

Share This

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 18 Dec 2015
राज्य शासनाचे प्रशासकीय काम सुलभ होण्याच्या दृष्टीने अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाच्या शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सदनिका तसेच वाणिज्यिक व औद्योगिक वापराच्या जागेची विक्री, हस्तांतरण करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत व विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

खडसे म्हणाले, राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांना शासकीय प्रकल्पासाठी शासकीय जमिनीची वेळोवेळी आवश्यकता भासते, अशी शासकीय जमीन शासनाच्या विभागांना प्रदान करण्यात सध्याच्या पद्धतीमध्ये होत असलेला विलंब टाळण्यासाठी आता अशा जमिनी राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांना सारामाफीने व महसूलमुक्त प्रदान करण्यात येणार आहेत. अशा जमिनीचे क्षेत्रफळ नागरी किंवा महानगर क्षेत्रामध्ये एक हेक्टरपेक्षा जास्त व अशा क्षेत्राबाहेर पाच हेक्टरपेक्षा जास्त असल्यास जिल्हाधिकारी यांनी अशा जमिनी देण्यापूर्वी विभागीय आयुक्तांची पूर्वमंजूरी घेणे आवश्यक राहणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages