पश्‍चिम रेल्वेवर लोकलच्या 13 फेऱ्यांचा विस्तार 11 फेऱ्यांचा वेग वाढणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पश्‍चिम रेल्वेवर लोकलच्या 13 फेऱ्यांचा विस्तार 11 फेऱ्यांचा वेग वाढणार

Share This
पश्‍चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी 1 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू होत आहे. लोकलच्या 13 फेऱ्यांचा विस्तार करण्यात येणार असून 11 फेऱ्यांचा वेग वाढणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार पश्‍चिम रेल्वेवर दररोज एक हजार 305 लोकल फेऱ्या होतील; त्यापैकी 110 फेऱ्या हार्बर मार्गावरील आहेत. 

पश्‍चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल यांनी गुरुवारी (ता. 31) नवीन वेळापत्रकाचे प्रकाशन केले. या वेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र कुमार, ए. के. श्रीवास्तव, मणिजीतसिंह, मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन उपस्थित होते. 

विरारच्या दिशेने सात फेऱ्या आणि चर्चगेटच्या दिशेने सहा फेऱ्यांचा विस्तार करण्यात आला आहे. अंधेरी येथून वसई रोडसाठी सुटणारी लोकल आता चर्चगेट स्थानकावरून रवाना होईल. चर्चगेटवरून वांद्य्रासाठी सुटणारी लोकल बोरिवलीपर्यंत चालवण्यात येईल. चर्चगेट-वसई रोड लोकल विरारपर्यंत धावेल. बोरिवली-नालासोपारा लोकल आता अंधेरी-विरार स्थानकांदरम्यान चालवण्यात येईल.
चर्चगेट-वांद्रे लोकलसेवा भाईंदरपर्यंत वाढवण्यात येईल. बोरिवली-भाईंदर लोकल नालासोपारा स्थानकापर्यंत चालवण्यात येतील. विरार-अंधेरीदरम्यानच्या दोन्ही लोकल चर्चगेटपर्यंत धावतील. वसई रोड-अंधेरी लोकल आता चर्चगेटपर्यंत चालवण्यात येईल. वसई रोड-चर्चगेट लोकल विरारपर्यंत धावेल. बोरिवली-चर्चगेट आणि अंधेरी-चर्चगेट लोकल आता विरार स्थानकावरून सुटतील.

फेऱ्यांचा वाढणार वेग 
लोकलचा वेग वाढणार असल्याने 11 फेऱ्यांच्या प्रवासाची वेळ चार ते नऊ मिनिटांनी कमी होईल. विरार-चर्चगेट मार्गावरील 10 आणि विरार-दादर मार्गावरील एक अशा 11 फेऱ्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. मेल-एक्‍स्प्रेसच्या वेळापत्रकात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages