मुंबई / JPN NEWS.in - दोन हजार चौदापर्यंतच्या झोपड्यांना मान्यता देण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली. पी. डी. मेलो रोड येथे पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंदू मिल विजयी मेळाव्यात आठवले बोलत होते.
झोपड्यांना अधिकृत करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला. झोपडीवासीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच मुंबईत तीन लाख झोपडीवासीयांची विशाल झोपडपट्टी संरक्षण परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. झोपडीवासीय हेही भारतीय नागरिक आहेत. 2014 च्या निवडणुकीत मतदान केलेल्या झोपडवासीयांच्या झोपड्या अधिकृत कराव्यात, असेही ते म्हणाले. पक्षाच्या मुंबादेवी तालुका शाखेचे उद्घाटन या वेळी करण्यात आले. कार्यक्रमाला पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे, तानसेन ननावरे, जिल्हाध्यक्ष सो. ना. कांबळे, युवक आघाडी अध्यक्ष रमेश गायकवाड, बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, आशा लांडगे, अभया सोनवणे, माधुरी कांबळे, जयश्री कांबळे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment