मुलांना भीक मागायला लावणाऱ्यां 207 जणांना अटक - 457 मुलांची मुक्तता - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुलांना भीक मागायला लावणाऱ्यां 207 जणांना अटक - 457 मुलांची मुक्तता

Share This
मुंबई JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in - लहान मुलांना भीक मागायला लावणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. वर्षभरात 208 गुन्हे दाखल करून मुलांचे पालक, कुटुंबीय, दलाल आदी 207 जणांना अटक केली आहे. या कारवायांत तब्बल 457 मुलांची मुक्तता झाली. 

रेल्वेस्थानके, बस थांबे, गर्दीची ठिकाणे व सिग्नलवर लहान मुलांना सोबत घेऊन काही महिला व पुरुष भीक मागतात. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवायांत सुटका झालेल्या मुलांना बाल कल्याण विभागाच्या ताब्यात दिले जाते. यापूर्वी झालेल्या कारवायांत बाल कल्याण विभागाच्या ताब्यात दिलेल्या मुलांना त्यांच्या पालकांकडे सोपवले जायचे. ही मुले काही दिवसांनी पुन्हा भीक मागताना दिसत असत. हे प्रकार टाळण्यासाठी समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी महिला व बाल कल्याण विभाग, बाल कल्याण अधिकारी आदींनी टास्क फोर्स तयार केला. या फोर्सची कार्यपद्धती तयार केली.


काही महिन्यांपूर्वी दक्षिण मुंबईला भिकारीमुक्त करण्याचा प्रयत्न झाला होता. मुले व त्यांना भीक मागायला लावणाऱ्यांविषयी तपास केल्यानंतर भीक मागणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणारे त्यांच्या जवळपासही फिरकत नसल्याचे आढळले. त्यामुळे या कारवाया करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. मुलांना पुन्हा भीक मागायला लावणाऱ्यांवर कारवाया सुरू झाल्या. गेल्या वर्षी लहान मुलांना भीक मागायला लावणाऱ्या तब्बल 207 जणांवर गुन्हे दाखल झाले.

ही मोहीम यंदाही तेवढ्याच वेगात सुरू राहील, असे समाजसेवा शाखेचे उपायुक्त प्रवीण पाटील यांनी सांगितले. पोलिसांच्या बाल अत्त्याचारविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत सुटका झालेल्या 457 पैकी तब्बल दीडशे मुले आता शाळेत शिकत आहेत. या मुलांच्या पुनर्वसनासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, तसेच अन्य घटकांचीही मदत लागेल, असे उपायुक्त पाटील यांनी सांगितले

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages