गोरेगाव मुलुंड जोडरस्त्याच्या फेरविचारासाठी पालिका दोन कोटी 69 लाख रुपये खर्च करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गोरेगाव मुलुंड जोडरस्त्याच्या फेरविचारासाठी पालिका दोन कोटी 69 लाख रुपये खर्च करणार

Share This
मुंबई JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in
महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता परवानगीच्या गतिरोधकात अडकू नये यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी त्याचा फेरविचार करून त्यानंतरच निविदा काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. या फेरविचारासाठी पालिका तब्बल दोन कोटी 69 लाख रुपये खर्च करणार आहे. 
मुंबई महापालिकेने आरे वसाहतीतून जाणारा गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता उन्नत करण्याचा निर्णय घेतला होता. या रस्त्यासाठी तब्बल 1300 कोटी रुपये खर्च येणार होता. तसेच या मार्गातील दोन हजार 224 झाडांवर कुऱ्हाड चालण्याची शक्‍यता आहे. या रस्त्याचा सर्वाधिक 6.10 किलोमीटरचा भाग आरे वसाहतीतून जातो. पवई आयआयटीमधून 1.80 किलोमीटरचा रस्ता आणि पालिकेच्या पाणी विभागाच्या हद्दीतून 3.50 किलोमीटरचा रस्ता जाणार होता. यामुळे भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या प्रकल्पांना अडथळा येणार होता. तसेच सुरक्षेचा प्रश्‍नही निर्माण होणार होता. यामुळे परवानगी मिळविण्यात अडथळे निर्माण होण्याची शक्‍यता आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने अडचणीच्या ठिकाणी नऊ किलोमीटरचा भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा भुयारी मार्ग शक्‍य आहे का हे पडताळून पाहण्यासाठी तसेच पर्याय सुचविण्यासाठी पालिकेने पेडिको कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीला पालिका दोन कोटी 67 लाख रुपये मोजणार आहे. आराखडा बनविण्यासाठी सर्व पातळ्यांवर परवानगी मिळवण्याबरोबरच निविदा, रस्त्याचे बांधकाम सुरू करून देण्यापर्यंतची सर्व कामे या कंत्राटदाराला करायची आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages