दत्तक उद्याने ताब्यात घेण्यास सुरुवात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दत्तक उद्याने ताब्यात घेण्यास सुरुवात

Share This
मुंबई JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in
मुंबई महापालिकेने खासगी संस्थांना देखभालीसाठी दत्तक दिलेली उद्याने आणि मैदाने ताब्यात घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर तशी कार्यवाही सुरू झाली आहे. परंतु, या कारवाईच्या कक्षेत राजकारण्यांच्या ताब्यातील उद्याने येणार की नाही, असा प्रश्‍न मुंबईकरांना पडला आहे. 

पालिकेच्या उद्यान विभागाने शहरातील काही महत्त्वाची मैदाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु, मंत्रिपदावर असलेल्या नेत्यांच्या पंचतारांकित क्‍लबबाबतच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालिकेत शिवसेना-भाजपने उद्याने आणि मैदाने दत्तक देण्याच्या धोरणाला मंजुरी दिल्यावर वाद निर्माण झाला. त्यानंतर भाजपची पळापळ झाली. अखेरीस मुख्यमंत्री फडणवीस यांनी या धोरणाचा फेरविचार करण्याचे आणि खासगी संस्थांना दिलेले भूखंड परत घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेने तत्काळ कारवाईही सुरू केली आहे. करार संपलेल्या संस्थांना नोटीस पाठवण्यात आली असल्याचे उद्यान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसने या धोरणाच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. 

खासगी संस्थांबरोबर शिवसेना-भाजपच्या नेत्यांनीही पालिकेची मैदाने दत्तक घेतली आहेत. काहींनी तेथे पंचतारांकित क्‍लबही बांधले आहेत. त्यामुळे खासगी संस्थांना दिलेले भूखंड परत घेण्याची कारवाई तत्काळ सुरू करणारी महापालिका राज्यकर्त्यांच्या क्‍लबबाबत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

करार संपलेली उद्याने (कंसात संस्था) 

  • - प्रियदर्शिनी पार्क, नेपियन्सी रोड (मलबार हिल रेसिडन्स फोरम)
  • - हॉर्निमल सर्कल गार्डन (हॉर्निमल सर्कल गार्डन ट्रस्ट )
  • - सीपीआय गार्डन, कफ परेड (द कफ परेड रेसिडन्स असोसिएशन )
  • - महेश्‍वरी उद्यान, माटुंगा (लार्सन ऍण्ड टुब्रो )
  • - माऊंट मेरी रोड गार्डन, वांद्रे (माऊंट मेरी रोड ऍडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट)
  • - साधू वासवानी गार्डन, वांद्रे-पश्‍चिम (कमला रहेजा फाऊंडेशन)
  • - मदर तेरेसा मैदान, खार (विलिंग्टन कॅथलिक जिमखाना)
  • - जनरल अरुणकुमार वैद्य क्रीडांगण, वांद्रे-पश्‍चिम (मुंबई एज्युकेशन ट्रस्ट)
  • - वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड गार्डन (ताज लॅण्ड एण्ड)
  • - कृष्णराव राणे मैदान, जुहू (इस्कॉन)

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages