मानवतावाद हाच भारतीय संस्कृतीचा प्रमुख पाया - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मानवतावाद हाच भारतीय संस्कृतीचा प्रमुख पाया - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

Share This
मुंबई / JPN NEWS.in - भारतीय संस्कृतीची बलस्थाने अनेक असून, प्रत्येक धर्म हा सत्य आणि अहिंसेची शिकवण देतो, आयुष्य जगताना मानवी मूल्ये ही महत्त्वाची असून, मानवतावाद हाच भारतीय संस्कृतीचा प्रमुख पाया आहे, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. 

सायन येथील सोमय्या मैदानावर श्रीमद विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज लिखित ‘मारुं भारत, सारुं भारत’ ग्रंथाचे प्रकाशन मोहन भागवत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. डॉ. मोहन भागवत म्हणाले की, ‘प्राचीन संस्कृतीचा प्रसार प्रथमत: भारतातच होणे गरजेचे असून, त्यानंतर तो विदेशात करणे गरजेचे आहे. आपल्या देशात विविध धर्म, संस्कृती नांदत असून, हे सर्व धर्म आपणाला सत्य आणि अंहिसेचाच मार्ग दाखवितात. भारतवर्षाला खरोखरच प्रगत बनवायचे असेल, तर प्रथमत: तरुणांनी पुढे आले पाहिजे, असेही भागवत यांनी यावेळी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages