मुंबई / प्रतिनिधी / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in
रिलायंस कंपनीला 4 जी टॉवर उद्याने मैदाने मोकळ्या जागी कोपऱ्यात उभारावे असे पालिकेचे निर्देश असतानाही चंदन वाडी स्मशान भूमी मध्ये लहान मुलांचे मृतदेह पुरण्याच्या जागेवर टॉवर उभारण्याचे काम सुरु केले होते. पालिकेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता आणि अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांची भेट घेतली आणि कारवाईची मागणी केली. याची दखल घेत संजय देशमुख देशमुख यांनी रिलायंस कंपनीच्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर एमआरटीपी कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आंबेरकर यांनी दिली.

मुंबईमधे रिलायंस कंपनीला 4 जी टॉवर उद्याने मैदाने मोकळ्या जागी कोपऱ्यात उभारावे असे पालिकेचे निर्देश आहेत. या निर्देशाला केराच्या टोपलीत टाकत रिलायंसने चंदनवाडी स्मशान भूमीत लहान मुलांचे मृतदेह पुरण्याच्या जागी टॉवर उभारण्याचे काम सुरु होते. या कामा दरम्यान लहान मुलांचे मृतदेहाचे सांगाडे बाहेर आले होते. यामुले मुंबईकर नागरिकांच्या मनात संतापाची लाट पसरली. याची दखल घेत पालिकेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी कोंग्रेसच्या नगरसेवकासह स्मशानभूमित जाउन निदर्शने केली आणि रिलायंसचे काम बंद पाडले.