मुंबईमधील पालिकेची उद्याने व मैदाने दत्तक तत्वावर देण्याचा प्रस्ताव भाजपाने आपल्या भुमिकेवर यूटर्न घेतल्याने सत्ताधारी शिवसेनेने बहुमताच्या जोरावर सभागृहात मंजूर केला. मुंबईमधील लहान मुलाना यापुढे खेळायला उद्याने, मैदाने उपलब्ध राहणार नसल्याने गुरुवारी कोंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकानी पालिका मुख्यालयात तीव्र आंदोलन केले.
राष्ट्रवादी आणि कोंग्रेस पक्षाच्या नगरसेवकानी पालिका मुख्यालयात "भूखंड विकले आता रस्ते आणि पद्पथ विका, लहान मुलानी खेलायाचे कुठे ? महापौर बंगल्यावर , मतोश्रीवर अश्या घोषणा देउन मुख्यालय दणाणुन सोडले होते. राष्ट्रवादी आणि कोंग्रेस पक्षाच्या नगरसेवकानी महापौर व आयुक्त कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केल्यावर आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे गटनेते जाण्याचा इशारा धनंजय पिसाळ आणि देवेंद्र आंबेरकर यांनी दिला आहे. पिसाळ यांनी मुंबई मधे सर्वत्र रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. भाजपाने योग्य भूमिका न घेतल्याने मुंबईमधील खेलाची मैदाने आता मुलाना खेलन्यास उपलब्ध राहणार नसल्याचा आरोप आंबेरकर यांनी केला आहे. बुधवारी खेलाच्या मैदाना बाबतचा प्रस्ताव मंजूर करताना अनुपस्थित राहिलेल्या 20-25 नगरसेवकाना कारणे दाखवा नोटिस बजावली असल्याचे आंबेरकर यांनी सांगितले. दरम्यान याबाबत मनसेनेही पालिका सभागृहाबाहेर क्रिकेट खेलून सेना भाजपाचा निषेध नोंदवला.