‘जीआरपी’च्या हेल्पलाइनवर वर्षभर ९५२ कॉल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 January 2016

‘जीआरपी’च्या हेल्पलाइनवर वर्षभर ९५२ कॉल

मुंबई / JPN NEWS.in : रेल्वे प्रवासी याबाबत जागरूक झाल्याने अशा प्रकारचे जवळपास ९५२ कॉल रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) हेल्पलाइनवर करण्यात आले. याचबरोबर महिला प्रवाशांकडूनही तक्रारींचा ओघ हेल्पलाइनवर पडला असून फेरीवाल्यांविरोधातही हेल्पलाइनवर तक्रारी करण्यात आल्या आहेत.

एखाद्या रेल्वे प्रवाशाला प्रवासादरम्यान काही समस्या निर्माण झाल्यास रेल्वे पोलीस हेल्पलाइन ९८३३३३११११ क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. हेल्पलाइन येथील कर्मचारी तक्रारदाराची तक्रार ऐकून घेऊन तक्रारदार प्रवासी ज्या रेल्वे स्थानकात, लोकल किंवा मेल आहे, त्यास अनुसरून संबंधित रेल्वे स्थानकातील वोडाफोन क्रमांकावर संपर्क करून त्यांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतात. या हेल्पलाइनवर २0१५ मध्ये संशयित व्यक्ती आणि बॅगांबाबतही कॉल करून आपण जागरूक असल्याचे प्रवाशांनी दाखवून दिले आहे. संशयित व्यक्तींबाबतचे एकूण १२७ कॉल तर बेवारस व संशयित बॅगांबाबत एकूण ८२५ कॉल हेल्पलाइनवर आले. यात संशयित इसमांची चौकशी करण्यात आली आणि त्यात काही आढळून न आल्याने त्यांना सोडून देण्यात आले. त्याचप्रमाणे संशयित बॅगांबाबतही काही आक्षेपार्ह काही मिळून आले नाही. महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांच्या विविध प्रकारच्या तक्रारींबाबतही एकूण १,२00 कॉल प्राप्त झाले. त्यानुसार त्यांना मदत व सुरक्षा पुरवण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. रेल्वे हद्दीत आणि लोकलमधून प्रवास करताना फेरीवाल्यांकडून मोठा त्रास होत असल्याने त्याबाबतही हेल्पलाइनवर तक्रारी करण्यात आल्या. असे ८७ कॉल आल्याची माहिती देण्यात आली.
रेल्वे प्रशासनाबाबत रेल्वे पोलीस हेल्पलाइनवर १९२ कॉल आले. त्याबाबतच्या तक्रारी रेल्वे प्रशासनाला कळवण्यात आल्या. वैद्यकीय मदत : अपघात, अपमृत्यू आणि वैद्यकीय मदतीबाबतही एकूण १,0८१ कॉल आले. त्यापैकी ६२0 कॉल जखमींचे, अपमृत्यूबाबत १४६ तर वैद्यकीय मदतीबाबतचे ३१५ कॉल आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad