मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून २१ कोटींचा मदत निधी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून २१ कोटींचा मदत निधी

Share This
JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in    मुंबई : यंदाच्या मुंबई मॅरेथॉनने यापूर्वीचे मदत निधीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढताना सुमारे २८७ स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमांतून आतापर्यंत २१ कोटींचा मदत निधी गोळा केला आहे. मुंबई मॅरेथॉन होण्यापूर्वी हा आकडा २५ कोटींपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली. 

मुंबई मॅरेथॉनमध्ये 'रन फॉर कॉज'साठी स्वदेस फाउंडेशन, नर्गिस फाउंडेशन, बॉम्बे मेडिकल ऐड फाउंडेशन, ईशा विद्या, लाइट ऑफ लाइफ ट्रस्ट, लव अँन्ड केअर, प्रोकॅम इंटरनॅशनल या संस्था सहभागी होणार असून, मदत निधी उभारण्यात या संस्थांनी योगदान दिले. गेल्या १३ वर्षांत १५0 कोटींहून अधिक मदत निधी विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनसेवेच्या कामी आला आहे. २00४ साली सुरू झालेल्या या मोहिमेतून त्यावेळी १.४४ कोटींचा निधी उभारण्यात आला. राज्यातील गरीब जनतेला मूलभूत सोयी देणे, दुर्लक्षित खेडेगावात रस्ता व वीज पोहोचवणे, अदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकली तसेच शिक्षक - विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देणे, अशी समाजोपयोगी कामे या संस्थांमार्फत होतात.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages