पालिका आरोग्य विभागातील परिचारिका सामाजिक दायित्त्वाने करीत असलेले कार्य गौरवास्पद महापौर स्नेहल आंबेकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका आरोग्य विभागातील परिचारिका सामाजिक दायित्त्वाने करीत असलेले कार्य गौरवास्पद महापौर स्नेहल आंबेकर

Share This
JPN NEWS ( Voice Of Citizens ) www.jpnnews.in
मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील वैद्यकीय सेवा  सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेता, परिचारिका वर्ग हा सामाजिक दायित्त्वाने करीत असलेले कार्य गौरवास्पद व अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले. महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल येथील टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय सभागृह, बाई य. ल. नायर रुग्णालय येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.


महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या की, महापालिकेच्या आरोग्य विभागाचा व्याप लक्षात घेतल्यानंतर दाखल झालेल्या रुग्णांची सर्वस्वी जबाबदारी ही डॉक्टर व परिचारिकांची असते. परिचारिकांचे रुग्णांशी व्यवस्थित संभाषण असेल तर रुग्ण अर्धा बरा होतो. महापालिकेमधील परिचारिकांचे आरोग्य दायित्त्व लक्षात घेता त्या आपले कर्तव्य पूर्ण सक्षमतेने पार पाडीत असल्याचे पहावयास मिळते, असे त्या म्हणाल्या. पालिकेची आरोग्य व्यवस्था उत्तम व दर्जेदार असून आरोग्य परिचारिका सामाजिक जाणिवेने करीत असलेल्या सेवेमुळे पालिका रुग्णालयांत वैद्यकीय उपचारांसाठी दाखल होत असल्याचेही त्यांनी सांगितले. परिचारिकांवरील कामाचा व्याप लक्षात घेऊन रिक्त असलेल्या पदांची त्वरित भरती प्रक्रिया प्रशासनाने सुरु करावी, असे निर्देशही महापौरांनी प्रशासनास दिले.

कार्यक्रमास उप महापौर अलका केरकर, सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षा सुनिता यादव, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) संजय देशमुख, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. सुहासिनी नागदा, बाई य. ल. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खातेप्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) डॉ. महेंद्र वाडिवाला आणि कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर हे मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages