शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सामान्य माणसासाठी काम करावे- पंकजा मुंडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सामान्य माणसासाठी काम करावे- पंकजा मुंडे

Share This


मुंबई / JPN NEWS.in :   ग्रामविकास विभागाची 97 टक्के पदे भरुन राज्य सक्षम करण्याचा शासन प्रयत्न करीत असून शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सामान्य माणसासाठी काम करावे, असे निर्देश ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.  

आझाद मैदान येथे महाराष्ट्र अंगणवाडी सहायक प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका संघाच्या आंदोलकांची भेट घेतली तेव्हा मुंडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सरकार सकारात्मक विचार करीत आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली. दोन्ही वर्षांची भाऊबीज देण्यासाठी निधीची तरतूद करुन वितरीत करण्यात आले आहे. पर्यवेक्षिकांचे संवर्ग आणि पदोन्नतीसाठी सचिव स्तरावरचा अहवाल मागून या प्रश्नाबाबत सकारात्मक विचार करुन हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तसेच ज्या न्याय व रास्त मागण्या आहेत त्या तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages