कोठडीतील आरोपीच्या मृत्यूस वरिष्ठ पोलिस ऱ्याला जबाबदार धरा - उच्च न्यायालय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोठडीतील आरोपीच्या मृत्यूस वरिष्ठ पोलिस ऱ्याला जबाबदार धरा - उच्च न्यायालय

Share This
मुंबई - JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in 
पोलिस कोठदीत दोन वर्षांत (2014-15) किती आरोपींचा मृत्यू झाला, अशा प्रकरणांत राज्य सरकारने काय कारवाई केली, अशी विचारणा करीत कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्यास त्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला जबाबदार धरण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. 13) दिले. 

वडाळा येथील पोलिस कोठडीत एका आरोपीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाची दखल न्यायालयाने "स्यू मोटो‘ याचिकेद्वारे घेतली आहे. पोलिस ठाण्यात सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी या वेळी न्यायालयात दिली. सीसी टीव्ही लावण्याचे काम तातडीने पूर्ण करा, त्याला अधिक विलंब लावू नका, असे या वेळी न्यायालयाने बजावले. कोठडीतील आरोपीचा मृत्यू झाल्यास त्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला जबाबदार धरा, असे आदेशही न्यायालयाने या वेळी दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages