नगरसेवक निधीचा वापर म्हाडाच्या वसाहतींमध्येही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 January 2016

नगरसेवक निधीचा वापर म्हाडाच्या वसाहतींमध्येही

मुंबई -  JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in 
म्हाडाच्या वसाहतींमध्ये आमदार, खासदार यांचा निधी वापरला जातो; मात्र आता या वसाहतींमध्ये नगरसेवक निधीही वापरला जाणार आहे. पालिका प्रशासनाने नगरसेवक निधीच्या वापराच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यास संमती दर्शविली आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरात म्हाडाच्या इमारती आहेत. या इमारतींच्या संरक्षक भिंती आणि अंतर्गत मोकळ्या जागेतील सिमेंट-क्रॉंक्रीटीकरण, चेकर्ड टाईल्स बसविणे आदी कामे फक्त आमदार व खासदार यांच्याच निधीतून होत होती. सामान्यांचा थेट संबंध नगरसेवकांशी येतो. त्यामुळे जनतेशी थेट संबंध येणाऱ्या नगरसेवकांचा निधी म्हाडाच्या वसाहतींमध्ये वापरण्यास परवानगी मिळावी याबाबतच्या ठरावाची सूचना मनसेचे नगरसेवक ईश्‍वर तायडे यांनी पालिकेच्या सभागृहात मांडली. त्यांच्या सूचनेला प्रशासनाने संमती दर्शविली आहे. त्यामुळे आता म्हाडाच्या वसाहतींच्या आवारातील मोकळ्या जागेत नागरी सुविधा पुरविणे आता शक्‍य झाल्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत. वसाहतींमध्ये आसन व्यवस्था, खुर्च्या बसविणे, मलनिःसारण वाहिन्या, सांडपाणी व्यवस्था, संरक्षक भिंतीची दुरुस्ती आदी कामे आता नगरसेवक निधीतून केली जाणार आहेत. त्यासाठी नगरसेवक निधीच्या वापराच्या निकषांमध्ये सुधारणा घडविणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Post Bottom Ad