तरतूद केलेली रक्कम मुंबईकरांसाठी खर्च होणार नसेल तर मोठ्या आकड्यांचा अर्थसंकल्प काय कामाचा ? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तरतूद केलेली रक्कम मुंबईकरांसाठी खर्च होणार नसेल तर मोठ्या आकड्यांचा अर्थसंकल्प काय कामाचा ?

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
निवडणुकीच्या तोंडावर मोठा अर्थसंकल्प सादर करून प्रत्यक्षात मात्र त्यातल्या तरतुदी वापरल्याच जाणार नसतील तर३७ हजार ५२ कोटींचा अर्थसंकल्प मुंबईकरांच्या काय कामाचाअसा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला आहे


गेल्या वर्षी मुंबई महापालिकेने ३३ हजार ५१४ कोटींचा अर्थसंकल्प सादर केलामात्र सुधारित अंदाजानुसार त्यातील फक्त २२ टक्के तरतुदी वापरल्या गेल्याकडे लक्ष वेधत अहिर यांनी यंदाचा अर्थसंकल्प देखील गतवर्षीसारखा निव्वळ कागदावरच राहणार असेल तर ती मुंबईकरांची केलेली फसवणुक ठरेलअशी जळजळीत प्रतिक्रिया दिलीतसेच महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी पायाभुत सुविधांवर फक्त ३० टक्के रक्कम वापरण्यात आली असून अर्थसंकल्पाची अधिकाधिक रक्कम केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांवर खर्च करण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलीएकूणच काय तर मुंबईकरांच्या भल्यापैक्षा मोदींना खुष करण्यासाठीचा हा अर्थसंकल्प असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

मुंबई महापालिकेने वर्ष २०१६ -१७ साठी तब्बल ३७ हजार ५२ कोटी रुपयांचा विक्रमी अर्थसंकल्प सादर केला आहेमात्र निवडणुकीच्या तोंडावर असे विक्रमी आकडे दाखवून मतांवर प्रभाव टाकण्याचा हा प्रकार असून प्रत्यक्षात ही सगळी रक्कम मुंबईकरांसाठी खर्च करण्यात येणार आहे का याचा खुलासा अगोदर सत्ताधारी आणि प्रशासनाने करावा.कारण मुंबईच्या पायभुत सुविधांसाठी एकूण अर्थसंकल्पापैकी ३० टक्के म्हणजे फक्त १२ हजार ८७४ कोटींची तरतूद करण्यात आली आहेगेल्यावर्षी देखील साधारण अकरा हजार कोटींची तरतूद पायाभूत सुविधांसाठी केली गेली होतीमात्र प्रत्यक्षात त्याच्या अर्धी रक्कमही खर्च झाली नाहीशिवाय गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील एकूण रकमेच्या प्रमाणात फक्त २२ टक्के रक्कम खर्च करण्यात आली होतीया मुद्द्याकडे लक्ष वेधत माअहिर म्हणाले कीमहापालिका ही काही प्रॉफिट मेकींग बॉडी नाहीमहापालिकेला विविध स्त्रोतांद्वारे मिळणारा महसुल हा मुंबईकरांचा पैसा आहेतो मुंबईकरांसाठी खर्च करणे हे महापालिकेचे कर्तव्य आहेते पार पाडण्याऐवजी महापालिका जर लोकांसाठी पैसा खर्च न करता विविध ठेवींमध्ये तो गुंतवून व्याज कमावत असेल तर ते सर्वार्थाने चुकीचे आहेतसेच अर्थसंकल्पात प्राधान्यक्रमाचे भानही बाळगलेले दिसत नाही.उदाहरणच द्यायचे झाले तर एलईडी दिव्यांवर कोट्यवधींच उधळण आणि महिलांच्या प्रसाधनगृहासाठी मात्र अवघे पाच कोटी रुपयांची तरतूद करणे कितपत योग्य आहे असा सवालही त्यांनी केलायावरून हे सरकार महिलांविषयी असंवेदनशील असल्याचे स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले.

तसेच यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये महापालिका प्रशासनाने स्वच्छ भारत वगैरे सारख्या केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या योजनांवर आर्थिक तरतूद करण्याची काही गरज नव्हतीकारण ज्या योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या आहेतत्यांच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्याकडून निधी येणे अपेक्षित असतेत्याऐवजी अशा योजनांकडे वळवलेला पैसा मुंबईकरांसाठी नव्या योजना आणून त्यावर खर्च केला असता तर ते अधिक योग्य ठरले असतेअसा मुद्दाही त्यांनी यावेळी मांडलामात्र फक्त मोदींना खुष करण्यासाठी या योजनांसाठी तरतूद करण्याबाबत प्रशासनावर दबाव आणून भाजपने शिवसेनेची खोड जिरवण्याचा प्रयत्न यातून स्पष्ट दिसत असल्याचे सांगत शिवसेना आणि भाजपाच्या भांडणात मुंबईकरांचे मात्र नकसान झाल्याचे ते म्हणालेत्यामुळे उगाच मोठ्या आकड्यांचा अर्थसंकल्प सादर करून आपली पाठ थोपटून घेण्याऐवजी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी तरतूद केलेल्या रकमेपैकी जास्तीत जास्त रक्कम किमान मुंबईकरांसाठी खर्च करावीअशी आग्रही भुमिका अहिर यांनी यावेळी मांडली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages