मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
देशात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर देशाच्या आर्थिक राजधारी असणाऱया मुंबईचा आज सादर झालेला अर्थसंकल्प विकासाची दिशा निश्चित करणारा आहे. तसेच तो मुंबईतील पायाभूत सेवा सुविधांचा विकास करणारा आहे. तर केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांसाठी महापालिकेच्या वाटयाची तरतूद करतानाच मुंबईतील उद्यांनांच्या विकासासाठी 312 कोटींची तरतूद, एलईडी दिवे, स्मार्ट सिटी यासाठी केलेली तरतूद पाहता हा अर्थसंकल्प मुंबईवर विकासाचा एलईडीसारखा शुभ्र प्रकाश पाडणारा आहे, अशी प्रतीक्रिया देत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले.
सामान्य माणसाला पारदर्शी कारभार देण्याचा आग्रह भाजपा सरकारचे असून महापालिकेच्या अर्थसंकल्पात ऑनलाईन परवाना पध्दत आणून पालिका आयुक्तांनी त्यातील भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर मुंबईच्या पाणी पुरवठयात वाढ व्हावी म्हणून गारगाई आणि पिंजाळ या प्रकल्पांसाठी पालिकेने 120 कोटींची तरतूद केली आहे. त्यासोबत मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्वाच्या असणाऱया कोस्टल रोडसाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. शिवाय मिठी नदीसह डंम्पिंग ग्राऊंड वरील प्रदूषण कमी करण्यासाठी तरतूद करताना पालिका आयुक्तांनी ग्रिन इंधन म्हणून इथेनॉईलवरील जकात रद्द केली आहे. तसेच सौर ऊर्जेला चालणा देण्याचा केंद्र आणि राज्य सरकाचा प्रयत्न असून महापालिकेनेही सौर ऊर्जेच्या निर्मितीसाठी 8 कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यामुळे ही बाब नक्कीच स्वागतार्ह आहे.
शिवाय रस्ते, मलनित्सारण, जलवाहिन्या, आरोग्य यंत्रणा.,घनकरा व्यवस्थापन व एकूणच पायाभूत सेवासुविधांसाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून देतानाच स्वच्छ भारत अभियानातील महत्वाचे असणाऱया गरिच्छ वस्ती सुधार,शौचालय बांधणे, स्वच्छता अभियान अशा सामान्य मुंबईकरांना आवश्यक असणाऱया गोंष्टींसाठीही निधी उपलब्ध करून दिला आहे. हायवेवर शौचालय उभारण्याचा निर्णयही महत्वाचा आहे.असे सांगत आमदार अॅड आशिष शेलार यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले. तसेच मुंबईकरांवर कोणतीही करवाढ न करता हा अर्थसंकल्प सादर करणाऱया आयुक्तांचे त्यांनी मुंबईकरांच्यावतीने आभारही मानले.
एलईडीने मुंबई उजळणार
वीजचे आणि बिलाची बचत करणारे एलईडी दिवे लावण्यासाठी महापालिकने 10 कोटींची तरतूद केली असून आगामी वर्षात मुंबई शहराचा बहूतांश भाग एलईडी दिव्याने उजळणार आहे. तसेच याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजूरीसाठी यायला लागले की, या दिव्यांना विरोध करणारेही उजळून निघतील अशीही अपेक्षा आहे, अशीही प्रतिक्रिया आमदार अॅड आशिष शेलार यांनी दिली.
भाजपाने खाजगीकरणास विरोध केल्यामुळे उद्यानांचा विकास पालिका करणार
मुंबईतील मैदाने आणि खेळाची मैदाने यांचे खाजगीकरण होऊ नये अशी भूमिका भाजपाने घेतली असून भाजपाने पालिकेच्या नव्या धोरणाचा फेर आढावा व्हावा म्हणून मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी केली ती त्यांनी मान्य केली. तर याबाबत विधानसभेत अशासकी विधेयकही आपण मांडले आहे. आता महापालिका आयुक्तांनी उद्यानांच्या विकासासाठी 312 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे उद्यानांचा विकास पालिका करेल व खाजगीकरणाला खिळ बसेल हा भाजपाचा विजय आहे, असेही आमदार अॅड आशिष शेलार यांनी म्हटले आहे.