घाटकोपरमध्ये लोकलच्या धडकेत ४ गॅंगमनचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

घाटकोपरमध्ये लोकलच्या धडकेत ४ गॅंगमनचा मृत्यू

Share This
मुंबई http://www.jpnnews.in 
मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर-विद्याविहार रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वेच्या चार तरुण गॅंगमनचा लोकलच्या धडकेत दुर्देवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा दुर्देवी अपघात झाला.  गोकूऴ, श्रवण, नाना आणि काशिनाथ अशी या चौघा मृतांची नाव आहेत. हे सर्व गॅंगमन विशी ते तिशीच्या वयोगटातील आहेत. गॅंगमन रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम करतात.
 
सीएसटीच्या दिशेने जाणा-या लोकलची या गॅगमनना धडक बसली. अपघातानंतर या गॅंगमनना तात्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तेथे त्यांचा मृत्यू झाला. रात्रपाळी संपवून हे कामगार घरी जायला निघाले असताना हा दुर्देवी अपघात झाला. हे चारही गॅंगमन रेल्वेचे कंत्राटी कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे ट्रॅकवर काम करताना नव्हे तर, रेल्वे रुळ ओलांडताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. दरम्यान रेल्वे पोलिस या अपघाताची चौकशी करत आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages