फडणवीस सरकारला शिवाजी महाराजांचा विसर – नवाब मलिक. - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

फडणवीस सरकारला शिवाजी महाराजांचा विसर – नवाब मलिक.

Share This
मुंबई http://www.jpnnews.in 
निवडणुक काळात मतदारांना भुलविण्यासाठी ‘शिवछत्रपती का आशीर्वाद; चलो चले मोदी के साथ’ अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारला आज शिवजयंतीच्या दिवशी महाराजांचा सोयीस्कर रित्या विसर पडला असून आज एकाही वृत्तपत्रातून शिवजयंतीची जाहीरात करण्यात आलेली नाही. एकीकडे ‘मेक इन इंडियाच्या’ जाहिरातींवर कोट्यावधी रुपये उधळणाऱ्या सरकारकडे शिवजयंतीसाठी पैसा शिल्लक नसणे ही दुर्दैवाची बाब असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.


तसेच शिवस्मारकाच्या बाबतीत देखील सरकार वेळकाढू पणाची भूमिका घेत आहे. मागील वर्षी शिव जयंतीला शिवस्मारकाचे भूमिपूजन करणार असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र अद्याप शिव स्मारकाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झालेली नाही. निवडणुक काळात उठता-बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या भाजपा सरकार मधील नेत्यांना निवडणुका संपल्यानंतर शिवाजी महाराजांचा विसर पडला असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages