डंपिंगबाबत कोंग्रेसचा आयुक्त कार्यालयावर मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 February 2016

डंपिंगबाबत कोंग्रेसचा आयुक्त कार्यालयावर मोर्चा

मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
देवनार गोवंडी येथील डंपिंग ग्राउंडमधे लागलेली आग गेले 4-5 दिवस धुमसत आहे. स्थानिक रहिवाशी आणि आजू बाजुच्या विभागातील रहिवाश्यांना याचा त्रास जाणवत असताना महानगरपालिकेकडून विशेष प्रयत्न करत नसल्याने कोंग्रेसच्या नगरसेवकानी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले.

डंपिंग ग्राउंड बंद करून डंपिंग ग्राउंड मुंबई बाहेर हटवावे, आग लावणाऱ्यावर कारवाई करावी, प्रदुषणा पासून मुंबई मुक्त करावी अश्या मागण्या करत सत्ताधारी शिवसेना भाजपा आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत कोंग्रेस नगरसेवकानी पालिका मुख्यालय दणाणून सोडले होते. आयुक्त कार्यालया बाहेर ठिय्या आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांनी आयुक्तांनी एसी कार्यालयातून बाहेर यावे निवेदन स्विकरावे आणि खुलासा करावा अश्या मागणीवर ठाम राहिल्याने अखेर आयुक्तानी नगरसेवकाची भेट घेतली.

यावेळी नगरसेवकानी पालिका बघ्याची भूमिका घेत आहे असा आरोप करत स्थानिक रहिवाश्यांना डोकेदुखी, डोळेदुखी, श्वसनाचे आजार होत आहेत याची गंभीर दखल पालिकेने घेवून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावर आयुक्त अजोय मेहता यानी डंपिंगवर आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला. आग लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आयुक्तांच्या देखरेखीखाली तपास सुरु असल्याचे मेहता म्हणाले.

डंपिंगची आग विझवण्याचे काम अग्निशमन दलाने चांगले केले आहे. डॉ. राजेशकुमार याविषयात तद्न्य आहेत. त्यांच्या सल्ल्याने आगीवर केमिकल टाकले आहे. चार दिवसात त्याचा अहवाल येईल. आरोग्य विभागाला निर्देश दिले आहेत. सर्व्हे करून औषधे आणि डॉक्टर वाढवण्यास सांगितले आहे. डंपिंगमधे कोणीही प्रवेश करू नए म्हणून ओळखपत्र देण्यात येतील. सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवली जाईल. उपआयुक्तांची समिती स्थापन करून चौकशी करण्यास सांगितले आहे. पुढे अशी आग लाग लागू नए म्हणून योग्य ती पाउले उचलण्याचे निर्देश देण्यात आल्याचे असे आयुक्त मेहता यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad