खेळाचे मैदान व उद्याने परत घेण्यासाठी पालिकेच्या २४ संस्थांना नोटीस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खेळाचे मैदान व उद्याने परत घेण्यासाठी पालिकेच्या २४ संस्थांना नोटीस

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
खेळाचे मैदान व उद्यानांची देखभाल करणाऱ्या ३६ संस्थांकडून भूखंडांचा ताबा पालिकेने परत घेतला आहे़ आता दुसऱ्या टप्प्यात २४ संस्थांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत़. तसेच ज्या संस्थांकडून भूखंड परत घेतला जाणार आहे अश्या संस्था न्यायालयातून स्थगिती आणू नये, म्हणून कॅवेट दाखल करण्याचा निर्णय देखील पालिकेने घेतला आहे़.  

खेळाचे मैदान व उद्यानांसाठी पालिकेने दत्तक धोरण आणले़ मात्र या धोरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती देऊन २१६ भूखंड परत घेण्याचे आदेश पालिकेला दिले़ त्यानुसार पालिकेने संबंधित संस्थांना नोटीस बजाविण्यास सुरुवात केली़ पहिल्या टप्प्यात ३६ संस्थांना नोटिसा देण्यात आल्या़. मात्र माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि एका बड्या संस्थेने न्यायालयात धाव घेतली़ परंतु न्यायालयात पालिकेच्या बाजूनेच निकाल लागल्यामुळे अखेर या दोन भूखंडांचा ताबा प्रशासनाला परत मिळवता आला़ त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात पालिकेने २४ संस्थांना नोटिसा पाठवून भूखंड परत करण्याची मुदत दिली आहे़ 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages