‘मेक इन इंडिया’ सप्ताहासाठी मुंबई महापालिका सज्ज - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘मेक इन इंडिया’ सप्ताहासाठी मुंबई महापालिका सज्ज

Share This
मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
‘मेक इन इंडिया’ हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी व देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे. केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या सह-आयोजनाची संधी महाराष्ट्र शासनाला दिलेली आहे. या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने बृहन्मुंबई क्षेत्रातील दर्शनी भागांवर होर्डिंग्ज, प्रतिकात्मक प्रतीके, भित्तीचित्र व भित्तीशिल्प आदींच्या माध्यमातून मुंबईकरांचे व या सप्ताहासाठी येणाऱया मान्यवरांचे लक्ष वेधून बृहन्मुंबई महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या कामांची प्रसिद्धी व मुंबईबाबतची ऐतिहासिक पार्श्वभूमी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या दृष्टीने ‘मेक इन इंडिया’ सप्ताहासाठी महापालिका सुसज्ज झाली आहे.

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी व भारताचे मुख्य व्यवसाय केंद्रस्थान आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मुंबईमध्ये ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे आयोजन दिनांक १३ ते १८ फेब्रुवारी, २०१६ दरम्यान होणार आहे. या प्रकारचे आयोजन हे भारतात प्रथमच होत आहे, ही मुंबईसाठी निश्चितच भूषणावह बाब आहे. या सप्ताहात अंदाजे ३० देशांचे प्रतिनिधी व सुमारे २००० विविध औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ‘मेक इन इंडिया’ सप्ताह विश्वस्तरावरील कार्यक्रम आयोजित होत आहे. ‘मेक इन इंडिया’ सप्ताहासाठी मुंबईतील विविध स्थळे निश्चित करणे, छपाई कामे, रंगरंगोटी, उत्पादन, विकास, माहिती शिक्षण व संवाद, कलाकाम, मॉडेल इत्यादी तयार करणे आदी कामे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे सोपविण्यात आली आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले की, ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाची माहिती मुंबईकरांपर्यंत पोहोचावी म्हणून महापालिकेच्यावतीने वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये बृहन्मुंबई क्षेत्रात २० भव्य असे होर्डिंग्ज मा. न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून व पालिका नियमांच्या पद्धतीने दर्शनी ठिकाणी लावण्यात येत आहेत. 

‘मेक इन इंडिया’ चे प्रतिक असलेले ‘सिंह’ हे शहरातील दर्शनी वरळी सी-फेस, माहीम जंक्शन, गिरगांव चौपाटी येथील बाबुलनाथ जंक्शन, राजीव गांधी सागरी सेतू (वरळी सी-लिंक), भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया), छत्रपती शिवार्जी टर्मिनस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका परिसर या महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. तसेच विविध ठिकाणी भारतीय संस्कृतीचे दर्शन होणारी भित्तीचित्र व भित्तीशिल्प रंगछटा रेखाटण्यात येणार आहेत. छत्रपती शिवार्जी टर्मिनस, बृहन्मुंबई महानगरपालिका परिसर, खान अब्दुल गफारखान खान मार्ग (वरळी सी-फेस) येथील स्व. बिंदू माधव ठाकरे चौक व नरिमन पाँईट भित्तीचित्र व भित्तीशिल्प रंगछटांचा समावेश आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages