मेक इन इंडियाच्या नियोजनातील त्रुटींची सखोल चौकशी व्हावी - धनंजय मुंडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मेक इन इंडियाच्या नियोजनातील त्रुटींची सखोल चौकशी व्हावी - धनंजय मुंडे

Share This
मुंबई / www.JPNnews.in दि. 15 - 
रविवारी मुंबईत मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात लागलेल्या आगीची घटना हि अतिशय दुर्दैवी आहे, या घटनेत जीवित हानी झाली नाही हे सुदैव, पोलीस आणि अग्निशामक दलानेही योग्य काम केले मात्र या कार्यक्रमाच्या परवानग्या घाई घाईने घेतल्या का ? आयोजनात निष्काळपणा झाला का ? याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.


जगासमोर राज्याच्या संस्कृतीच्या दर्शन घडवणा-या कार्यक्रमात अशी घटना घडावी हे खेदजनक आहे, ही घटना हा एक अपघात असल्याने त्यावर आम्ही  कसलेही राजकारण करणार नाही मात्र मंत्रालयाला आग लागल्यानंतर ही आग लावल्या गेली असा आरोप करणा-यांना अशा घटना म्हणजे अपघात असतात अशा आगी कोणी लावत नसते याची जाणीव झाली असेल असा टोला ही त्यांनी लगावला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages