मेक इन इंडियाची शो बाजी कशासाठी ? - राज ठाकरे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मेक इन इंडियाची शो बाजी कशासाठी ? - राज ठाकरे

Share This
मुंबई http://www.jpnnews.in 
महाराष्ट्र सरकारच्या मेक इन इंडिया सप्ताहावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टिका केली आहे. मेक इन इंडिया मला समजत नाही. उद्योगधंद्याच्या वाढीसाठी मेक इन इंडियासारखे इव्हेंट करण्याची काय गरज आहे ? तुम्ही कधी मेक इन चायना ऐकले आहे का ? ही शो बाजी कशासाठी ? 
मेक इन इंडियामध्ये करार झाल्याचे सांगतात मग आतापर्यंत देशात रोजगारामध्ये का वाढ झालेली नाही ? असे प्रश्न विचारत सरकारच्या मेक इन इंडिया योजनेचा राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. गिरगाव चौपाटीवर कार्यक्रम घेऊ नका असे उच्च न्यायालय, अग्निशमन दलाने सांगितले होते तरी तिथेच कार्यक्रम करण्याचा अट्टहास का  ? असा प्रश्न राज यांनी विचारला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही देशाचे पंतप्रधान वाटत नाहीत. ते गुजरातच्या प्रेमातच अडकून पडले आहेत अशी टीका राज यांनी केली.  आपल्या कृष्णकुंज निवासस्थानी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी शिवसेनेवरही टीकेचे आसूड ओढले. 

सत्तेमध्ये राहूनची चारा प्रश्नावर सरकारविरोधात आंदोलनाची भूमिका घेणा-या शिवसेनेची भूमिका आपल्याला समजत नाही असे राज म्हणाले. सत्तेत राहून सत्तेचे सर्व फायदेही घ्यायचे आणि जनतेला दाखवण्यासाठी सरकारचा विरोधही करायचा. सरकारमध्ये आहात मग आंदोलनाची गरज काय, जनतेचे प्रश्न तुम्ही सरकारमध्ये बसून सोडवले पाहिजेत असे राज म्हणाले.  

चारा छावण्या बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय घेता नंतर अंगावर आल्यावर सुरु करता अस का ? मग बंद करण्याचा निर्णयच का घेतला ? मार्च,एप्रिल मे मध्ये महाराष्ट्रात भीषण परिस्थिती निर्माण होईल असे राज यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages