‘मेक इन इंडिया’ - सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत का? - उच्च न्यायालय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘मेक इन इंडिया’ - सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत का? - उच्च न्यायालय

Share This
मुंबई http://www.jpnnews.in 
‘मेक इन इंडिया’ सारख्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणारे कलाकार, टेक्निशियन आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत का? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने याची माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.

रविवारी गिरगाव येथे ‘महाराष्ट्र रजनी’ च्या सेटला आग लागल्याच्या घटनेकडे खंडपीठाचे लक्ष वेधण्यात आले. सिनेकलाकारांच्या सुरक्षेसाठी काहीच मार्गदर्शक तत्त्वे नसल्यासंदर्भात असोसिएशन आॅफ एडिंग जस्टिस या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
‘या घटनेमुळे मुंबईचे नाव खराब झाले. स्टेजवर सुमारे ५० लावणी नर्तिका नृत्य करत असताना स्टेजला आग लागली. स्टेजवर नृत्य करणाऱ्या कलाकारांना बाहेर जाण्यासाठी कोणता रस्ता आहे आणि आपत्कालीन स्थितीत बाहेर जाण्यासाठी कोणता रस्ता उपलब्ध करण्यात आला आहे, याची काहीही कल्पना देण्यात आली नव्हती,’ असे याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील जमशेद मिस्त्री यांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने आत्तापर्यंत काही मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली असतील तर त्याची अंमलबजावणी करण्यात येते का? याचेही उत्तर खंडपीठाने राज्य सरकारला दोन आठवड्यांत देण्याचे निर्देश दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages