महाराष्ट्र दिनाच्या मुख्य सोहळ्याची शिवाजी पार्क येथे रंगीत तालीम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्र दिनाच्या मुख्य सोहळ्याची शिवाजी पार्क येथे रंगीत तालीम

Share This
मुंबई, दि.२९ : महाराष्ट्र दिनानिमित्त येत्या  मे रोजी दादर येथील शिवाजी पार्कवर होणाऱ्या मुख्य सोहळ्याची आज सकाळी रंगीत तालीम करण्यात आली. राजशिष्टाचार विभाग तसेच पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध पथकांचे संचलन, सुरक्षाविषयक विविध वाहनांचे प्रदर्शनयावेळी करण्यात आले.

महाराष्ट्र दिनाचा मुख्य सोहळा  मे  रोजी सकाळी  वाजता दादर येथील शिवाजी पार्कवर होणार आहे. आज या सोहळ्याची रंगीत तालीम घेण्यातआली. याप्रसंगी राज्य राखीव पोलीस , बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई महिला पोलीस दल,मुंबई लोहमार्ग पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस, राज्य राखीव पोलीस बल, अग्निशमन दल, गृहरक्षक दल निशाण टोळी, गृहरक्षक दल पुरुष, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, गृहरक्षक दल (महिला), नागरी संरक्षण दल पुरुष, नागरी संरक्षण दल(महिला), बृहन्मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा, बॅण्ड पथक, फिरती पथके आदींनी संचलन केले. तसेच याप्रसंगी मोटार परिवहन विभागाच्या वाहनांचे संचलन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages