मुंबई विमानतळाच्या परिसरातील झोपडपट्टीचे सर्वेक्षण तातडीने करावे - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई विमानतळाच्या परिसरातील झोपडपट्टीचे सर्वेक्षण तातडीने करावे - मुख्यमंत्री

Share This
मुंबईदि. 29 : मुंबई विमानतळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करावेअसे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विमानतळाच्या सुरक्षिततेसाठी झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भातील बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस खासदार पूनम महाजन, अतिरिक्त मुख्य सचिव पी. एस. मीना,नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीरगृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंहएमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदानमुंबई मेट्रो मेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडेम्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. झेंडेएमआयएएलचे आर. के. जैनअतिक्रमण विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दौलत देसाई तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले कीझोपडपट्ट्या सध्या ज्या जमिनीवर वसल्या आहेत त्याच जमिनीतील 100 एकर जागेवर झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. ज्या झोपडीधारकांचे सर्वेक्षण झाले आहे, त्यांचे पुनर्वसन लवकरात लवकर करण्यात यावे असेही ते म्हणाले. संदेशनगरइंदिरानगरसेवकनगर या झोपडपट्टयांमधील 6341 झोपड्यांचे सर्वेक्षण झाले आहे. त्यातील संदेशनगरचा आराखडा प्रसिध्द झाला असून प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages