डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आज पालिकेत ‘ऋणानुबंध अभियान’तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आज पालिकेत ‘ऋणानुबंध अभियान’तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

Share This
३० एप्रिल रोजी महापालिका आयुक्तांंच्या हस्ते प्रबोधन पर्वाचे उद्घाटन  
मुंबई / प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त ‘ऋणानुबंध अभियान’ अंतर्गत उद्या मंगळवार, दिनांक २६ एप्रिल, २०१६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पालिका मुख्यालयातील उपहारगृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक २५ एप्रिल, २०१६ रोजी ‘ऋणानुबंध अभियान’तर्फे इंजिनिअरींग हब, वरळी येथे संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात सुमारे १२७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मंगळवार, दिनांक २६ एप्रिल, २०१६ रोजी पालिका मुख्यालयातील उपहारगृहात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन ‘ऋणानुबंध अभियान’तर्फे केले आहे. तरी या शिबिरात सक्रिय भाग घेऊन आपल्या सहकाऱयांनादेखील रक्तदान करण्यास प्रवृत्त करुन या विधायक उपक्रमास हातभार लावावा, असे आवाहन ‘ऋणानुबंध अभियान’तर्फे करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकीचे कार्य करण्यासाठी ऋणानुबंध अभियानाची स्थापना केली आहे. विशवरत्न, भारतीय संविधानाचे निर्माते, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त प्रबोधन पर्वचे उद्घाटन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते शनिवार, दिनांक ३० एप्रिल, २०१६ रोजी इंजिनिअरींग हब, वरळी येथे सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस व अध्यक्ष म्हणून सह आयुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) एस. एस. शिंदे यांची उपस्थिती असणार आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages