पाणीचोरीबाबत शिवसेनेवर भाजपाचा निशाना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पाणीचोरीबाबत शिवसेनेवर भाजपाचा निशाना

Share This
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना देण्यात येणार्या पाण्याची टयान्कर माफियाकडून मोठ्या प्रमाणात पाणीचोरी होत आहे. या पाणी चोरी बाबत  कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी आयुक्तांकडे केली आहे. याचवेळी सत्ताधारी शिवसेनेनेवर निशाना साधत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा भाजपा या पाणीचोरीतील घोटाला बाहेर काढेल असा इशारा भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे.


खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेवून पाणीचोरी बाबत निवेदन आणि आकडेवारी सादर केली. महापालिका टयान्कर माफियाना एक लिटर पाणी एक पैशाला देते. टयान्कर माफिया हे एक लिटर पाणी एक रुपयाला विकते. 1 जानेवारी 2016 ते 10 एप्रिल 2016 या कालावधीत महापालिकेने टयान्कर माफियाना 39 हजार लिटर पाणी विकले. एम पूर्व विभागातील मानखुर्द गोवंडी देवनार या विभागातील लोकाना पाणी देण्यासाठी पालिकेने 13 हजार 424 टयान्करना, एन विभागात 5 हजार 948 टयान्करना, के इस्ट विभागात 3 हजार 935 टयान्करना तर के वेस्ट विभागात 6 हजार 478 टयान्करना परवानगी दिली आहे. यामधे मोठा घोटाला असल्याचे सोमय्या यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणले. यावेळी टयान्कर माफियावर कारवाई करावी अशी मागणी केली असता आयुक्तानी चौकशी करण्याचे आश्वासन दिले असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

दरम्यान आयुक्तांच्या भेटी नंतर पत्रकाराशी बोलताना पालिका काही विभागातच टयान्करना परवानगी का देते ? इतर ठिकाणी टयान्करना परवानगी का नाही ? मुंबई मधे पाणीचोरी मोठ्या प्रमाणात होत असताना शिवसेनेचा महापौर, स्थायी समिती अध्यक्ष असताना शिवसेना ही पाणी चोरी का थांबवत नाही असे प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केले आहेत. शिवसेनेने पाणीचोरी बाबत भूमिका जाहिर न केल्यास सत्तेत सहभागी असुनही भाजपा पाणीचोरीचा घोटाला बाहेर काढेल असा इशारा दिला आहे.

भाजपाचा आरोप धादांत खोटाटयान्कर माफियांचे प्रकार शिवसेनेने स्थायी समितीमधे उघडकीस आनले असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. टयान्कर माफियाबाबत शिवसेना पक्ष उदासीन धोरण घेत असल्याचा भाजपाचा आरोप धादांत खोटा आहे
>> तृष्णा विश्वासराव (सभागृह नेत्या)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages