मंदिरामधे किंवा दर्गामधे प्रवेशासाठी सुरु असलेले आंदोलन कुठल्याही धर्मा विरोधात नसून भारतीय राज्य घटनेने स्त्री, पुरुषाला दिलेल्या समान अधिकारासाठी आणि चुकीच्या परंपरेच्या विरोधात आहे अशी माहिती भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे हाजी अली दर्गामधे महिलांना प्रवेश मिळावा यासाठी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत तृप्ती देसाई बोलत होत्या.
यावेळी बोलताना केस कापणे, सती जाणे अश्या चुकीच्या परंपरा बंद झाल्या आहेत. त्यासाठीही ततकालीन समाजसुधारकानी आंदोलने केली आहेत. वेग वेगळ्या ठिकाणी एकाच देवाच्या मंदिरासाठी वेग वेगळ्या परंपरा लादल्या गेल्या आहेत. देवाने कुठल्याही परंपरा लादल्या नाहित. सर्व मंदिर मस्जिद मधे सर्व धर्माचे लोक जातात मग महिलाना प्रवेश का नाही असा प्रश्न उपस्थित करत भेदभाव लिंगभेद बाजुला ठेवून महिलाना समान अधिकाराप्रमाणे मंदिर दर्गामधे प्रवेश मिळायला पाहिजे असे देसाई म्हणाल्या.
महिलांना हाजी अली दर्ग्यामध्ये प्रवेश मिळण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. दर्ग्यामध्ये 2011 पर्यंत महिलांना प्रवेश होता; त्यानंतर अचानक बंदी केली. हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश नसला, तरी माहीम येथील दर्ग्यामध्ये प्रवेश दिला जातो, असा दावा "मुस्लिम फॉर सेक्यूलर डेमोक्रसी‘चे जावेद आनंद यांनी केला. हाजी अली दर्ग्यामध्ये सर्वांना प्रवेश देऊन भेदभाव नष्ट व्हावा, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूरातील, त्र्यंबकेश्वर आणि कोल्हापूरातील मंदिरात महिलांना प्रवेश मिळवून दिल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी आपला मोर्चा मुंबईतील हाजी अली दर्ग्याकडे वळविला आहे. येत्या 28 एप्रिल रोजी हाजी हली दर्ग्यात तमाम महिलांसमवेत प्रवेश करू अशी माहिती तृप्ती देसाई यांनी दिली.
यासाठी 'हाजी अली, सबके के लिए' नावाचा फोरम स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही कोणत्याही जात, धर्माविरोधात नाही. आम्ही फक्त समानता व महिलांना समान न्याय मिळावा यासाठी झगडत आहोत. दर्ग्यात प्रवेश करण्यापूर्वी आम्ही हाजी अली दर्गा ट्रस्टसोबत चर्चा करणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले. यावेळी ज्योती बडेकर, वर्षा विलास, हसन कमाल, जावेदानंद, जावेद सिद्धिकी, प्रकाश रेड्डी, झीनत शौकत अली, सईद मिर्झा, नसरीन कॉन्ट्र्याक्टर, मरियम ढवले, फिरोज मिठीबोरवाला इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत गोंधळ
तृप्ती देसाई यांच्या पत्रकार परिषदेत मु्स्लिम पुरुषांनी विरोध केला आहे. तसेच त्याठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. परंतू शरियत मधे आणि मुस्लिम समाजाच्या इतर जागतिक धार्मिक ठिकाणी महिलांना प्रवेश असल्याचे सांगितल्यावर या पुरुषांना पळवुन लावले.

No comments:
Post a Comment