नवी दिल्ली : प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांची राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त १० पैकी सात सदस्यांच्या जागा रिक्त झाल्याने त्यापैकी ही नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. जाधव हे अर्थतज्ज्ञ असून, ते नियोजन आयोगावर होते. डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सल्लागार समितीवरही होते. त्यांच्यामार्फत दलित समाजाला पक्षाजवळ आणण्याची भाजपाची इच्छा आहे. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नावासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह होता.
नरेंद्र जाधव यांच्यासह आॅलिम्पिक पदकविजेती खेळाडू मेरी कोम, माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू, ज्येष्ठ पत्रकार स्वपन दासगुप्ता, मल्याळम चित्रपट अभिनेते सुरेश गोपी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांचीही राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती नियुक्त १0 सदस्यांपैकी दोन खासदार गेल्या नोव्हेंबरमध्ये, तर पाच सदस्य २ एप्रिल रोजी निवृत्त झाले. उरलेले तिघे सदस्य २0१८ साली निवृत्त होत आहेत.


No comments:
Post a Comment