कितीही दडपशाही केली तरी कनैयाकुमारचा कार्यक्रम होणारच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कितीही दडपशाही केली तरी कनैयाकुमारचा कार्यक्रम होणारच

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव
शनिवारी 23 एप्रिल रोजी मुंबईमधे जेएनयुच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कनैयाकुमार याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पोलिस सरकारच्या एशार्यावर दडपशाही करून हा कार्यक्रम होऊ नए यासाठी प्रयत्नात आहेत. परंतू कितीही दडपशाही केली तरी कनैयाकुमार याचा कार्यक्रम होणारच असा इशारा धनंजय कानगुढ़े यांनी पत्रकार परिषदेत दिला.


मुंबई मराठी पत्रकार संघ येथे एसएफआय, एएसएफआय, एआयएसए, पीएसएफ, छात्रभारती, एआयडीएसओ, आरवायए, एआयवायएफ, डीवायएफआय या संघटनाद्वारे धर्मांध शक्तिंना पराभूत करा, प्रजासत्ताक भारताचे रक्षण करा असा संदेश देत भेदभावाविरोधात युवा विद्यार्थी मेळावा वरळी येथील जनता विद्यालयात कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम शाळेच्या संचालकांवर दबाव आणून पोलिसांनी कार्यक्रमाला दिलेली एनओसी मागे घ्यायला लावली. यामुले हा कार्यक्रम आता चेंबूर शेल कोलनी येथील आदर्श शालेच्या सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती धनंजय कानगुढ़े यांनी दिली.

पोलिसानी हां कार्यक्रम होऊ नए म्हणून वरली येथील शालेवर दबाव आणला, हा दबाव पोलिस आणत असले तरी असा दबाव आणायला मनुवादी सरकारच्या माध्यमातून आणण्यास लावला गेला आहे.   आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही अधिकारांचे हनन होऊ नए म्हणून काम करत आहोत, कार्यक्रम आयोजित करत आहोत.जनता जागृत होईल आणि सरकारला प्रश्न विचारेल म्हणून बंधने घालू नयेत. लोकशाही आणि संविधानाने दिलेल्या अधिकाराचे रक्षण करण्याचे काम पोलिसांचे आहे. पोलिसांनी आपले काम करावे असे आवाहन धनंजय कानगुढ़े यांनी केले.

शनिवारी कनैयाकुमार याचा कार्यक्रम काहीही केले कितीही दडपशाही केली तरी होणारच. कनैयाला काही हिंदुत्ववादी संघटनानी धमकी दिली आहे. कनैयाला आम्ही पूर्ण सरक्षण देणार आहोत. जर अश्या संघटनानी काही चुकीचे काम केले तर त्यांचा आमच्या पद्धतीन बंदोबस्त करू. पोलिसानी अश्या लोकांवर कारवाई करून अभिव्यक्ती स्वातंत्र्य अभादीत ठेवावे असे आवाहन  धनंजय कानगुढ़े यांनी केले आहे. यावेळी सागर दुर्योधने, प्रसाद घागरे, एड. प्रदीप सालवी, दत्ता चव्हाण, अभिलाषा, शंभुक उदय, प्रणय सालवी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान पत्रकार परिषद् संपत असताना कनैयाकुमार याच्या कार्यक्रमाला परवानगी दिली असल्याची माहिती उपस्थितानी दिली

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages