शिवसेनेने आयुक्तां विरोधातातील सभा तहकुबीची संधी गमावली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिवसेनेने आयुक्तां विरोधातातील सभा तहकुबीची संधी गमावली

Share This
मुंबई / प्रतिनिधी = विकास आराखडाचे सादरीकरण वैधानिक समिती असलेल्या सुधार समितीमध्ये नियमाने होणे अपेक्षित असताना पालिका आयुक्तांनी कोणताही वैधानिक दर्जा नसलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत या आराखडाचं सादरीकरण केले. त्यामुळे सुधार समिती अध्यक्षांसह सर्वपक्षीय सदस्यांचा हा अपमान झाला आहे, अशी तीव्र भावना सर्व पक्षीय सदस्यांनी आज सुधार समितीमध्ये व्यक्त  केली. याच अनुषंगाने समितीचे सदस्य संतोष धुरी यांनी सुधार समितीचे पुढील कोणतेही कामकाज न करता प्रशासनाच्या निषेधार्थ सभा झटपट तहकुब करण्याची मागणी केली. तसेच कॉंग्रेसचे सदस्य मोहसीन हैदर यांनीही पालिका नियमांचा अहवाला देत  विकास आराखड्याचे सादरीकरण पालिका सभागृहात होण्यापुर्वी सुधार समितीच्या बैठकीत व्हायालाच हवे, अशी आग्रही मागणी  केली.



मात्र आयुक्तांनी सुधार समितीमध्ये प्रथम विकास आराखडा सादर न केल्याने समिती अध्यक्षांसह सर्व पक्षीय सदस्यांचा घोर अवमान झाल्याचा निषेधार्थ सभा झटपट तहकुब करण्याची मागणी केली. मात्र शिवसेनेचे सदस्य राजू पेडणेकर यांनी या  तहकुबीला विरोध करीत विकास आराखड्याचे सादरीकरण सुधार समितीच्या विशेष सभेत करण्यात यावे, अशी मागणी केली. त्यावर अध्यक्षांनी राजू पेडणेकर यांची मागणी मान्य करत सभा झटपट तहकुबीची विरोधकांची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे  एका बाजूला महापालिकेत डंम्पिग, वॉटर टॅंकर, नालेसफाई आणि रस्ते घोटाळे असे एक एक घोटाळे आयुक्त बाहेर काढत अस ताना व भाजप या घोटाळ्यात शिवसेनेची घेराबंदी करुन शिवसेनेला चांगलेच अडचणीत आणत असताना सुधार समितीमध्ये झड पट तहकुबी व्दारे आयुक्तांना घेरण्याची संधी राजू पेडणेकर यांनी केलेल्या विरोधामुळे शिवसेनेला गमवावी लागली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages