मुंबई / प्रतिनिधी - घरो घरी शौचालय अशी योजना महापालिकेने आखली खरी पण केवळ अर्ज भरुन घेतल्यानंतर पुढे काय करायचे, याची साधी माहितीच महापालिकेच्या अधिकार्यांजवळ उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आज झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत उजेडात आली आहे. दरम्यान, घरो घरी शौचालय उभारण्याची महापालिकेची योजना सपशेल फेल ठरली आहे.
घरो घरी शौचालय उभारण्यासाठी विभागातून अर्ज भरु न घेण्याचे काम महापालिका करत आहे. आम्हीही लोकांकडून अर्ज भरुन घेत आहोत. पण हे अर्ज संगणकाव्दारे अपलोड होत नसल्याने याबाबत अधिकार्यांकडे चौकशी केली असता त्यांनी रात्री अर्ज संगणकाव्दारे अपलोड करण्यास वॉर्डातील अधिकार्यांकडून सांगितले जात आहे. पण अर्ज अपलोड होत नसल्याची तक्रार त्यांच्याकडे केली असता त्यांनी याबाबत वरच्या अधिकार्यांना बोलण्यास सांगितले. पण लोक आम्हाला आता विचारु लागले आहेत, की आमच्या घरी शौचालय कधी उभारणार, यावर आम्ही काय उत्तर देयाचे, असा प्रश्न सुधार समितीचे सदस्य संतोष धुरी यांनी विचारला.
दरम्यान, यावर उपायुक्त चंद्रशेखर चोरे यांनी सांगितले की, जिथे शौचालय उभारण्यासाठी जागा आहे तिथे डे्रेनेज लाइन नाही. जिथे जागा उपलब्ध नाही तिथे ड्रेनेज लाइन आहे, असा प्रश्न आहे. त्यामुळे मुंबई मध्ये जिथे शक्य आहे तिथे शौचालय उभारले जा तील. काही ठिकाणी वॉर्ड ऑफीसर नवीन असल्याने त्यांना घरो घरी शौचालयाच्या विषयाबद्दल माहिती नसल्याने अर्ज भरल्यानं तर काय करायचे, हे माहित नाही. या विषयासाठी उपायुक्त विजय बालमवार यांच्याकडे संपर्क साधवा


No comments:
Post a Comment