मुंबई / प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेच्या नगरबाह्य विभागात गांधी नगर पोखरण रोड क्रमांक 2 ठाणे येथे 1800 मिमि व्यासाच्या तानसा (पश्चिम) जल वाहिनीचे तातडिचे काम 10 मे सकाळी 11 वाजल्या पासून हाती घेण्यात येणार असून रात्री 11 वाजेपर्यंत पूर्ण होईल. सदर काम पूर्ण करण्यासाठी 36 तास चालणार आहे. यावेळात संपूर्ण मुंबईमधे 25 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. यावेळात उंचावरील भाग, थेट पाणी पुरवठा होणाऱ्या इमारतीमधे पाण्याचा दाब कमी असल्यामुले जास्त परिणाम जाणवणार आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा पुरेसा साठा करावा व पाणी काटकसरीने वापरून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकने ऑगस्टपासून 15 टक्के पाणी कपात लागू केली आहे.

No comments:
Post a Comment