मोदींच्या विदेश दौऱ्यांसाठी 117 कोटी रुपये खर्च - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोदींच्या विदेश दौऱ्यांसाठी 117 कोटी रुपये खर्च

Share This
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यांवर 2015-16 मध्ये एअर इंडियाने 117 कोटी रुपये खर्च केले आहेत. 2014-15 पेक्षा 25 टक्‍क्‍यांनी हा खर्च जास्त झाला आहे, अशी माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे. 
सेवानिवृत्त अधिकारी लोश बत्रा यांनी पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांवर झालेल्या खर्चाबाबतची माहिती माहिती अधिकारातून विचारली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ते डिसेंबर 2015 पर्यंत 22 देशांचे दौरे केले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या विदेश दौऱ्यांवर 2013-14 मध्ये 108 कोटी रुपये खर्च झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2015 मध्ये फ्रान्स, कॅनडा व जर्मनी या देशांचा केलेला दौरा सर्वाधिक महागडा ठरला आहे. या दौऱ्यांवर 31 कोटी रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती बत्रा यांना देण्यात आली आहे. 

पंतप्रधानांचे दौरे व खर्च (रुपयांमध्ये)
एप्रिल 2015 

फ्रान्स, कॅनडा व जर्मनी : 31 कोटी 

2014-15 
ऑस्ट्रेलिया, म्यानमार : 22 कोटी 

2015 
ब्राझील : 20 कोटी 
चीन, मंगोलिया व कोरिया : 15 कोटी 
उझबेकिस्तान, कझाकिस्तान, रशिया, तुर्कस्तान, किरगिझस्तान व ताजिकिस्तान : 15 कोटी

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages