मुंबई, दि. 30 : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने अठ्ठाविसाव्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी दिनांक 2 मे ते 11 मे 2016 या कालावधीत दररोज रात्री 8 वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली, मुंबई येथे होणार आहे. या स्पर्धेत एकूण 4 नाट्यप्रयोग सादर होणार आहेत.
व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सोमवार दिनांक 2मे रोजी सोनल प्रॉडक्शन्स निर्मित ‘परफेक्ट मिसमॅच’ हे नाटक,मंगळवार दिनांक 3 मे रोजी सोनल प्रॉडक्शन्स निर्मित ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ हे नाटक, शनिवार दिनांक 7 मे रोजी जिगिषा आणि अष्टविनायक निर्मित ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक आणि बुधवार दिनांक 11 मे रोजी अष्टविनायक निर्मित ‘श्री बाई समर्थ’ हे नाटक सादर होणार आहे. व्यावसायिक नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक 16 फेब्रुवारी ते 13 एप्रिल 2016 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. नाट्य रसिकांसाठी रु.50/- व रु.30/- इतक्या कमी रकमेची तिकीटे सर्व नाटकांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहेत. नाट्य रसिकांनी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचा बहुसंख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा,असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment