40 फुटी पोकलेन मशीन उपलब्‍ध होत नसल्‍यामुळे छोटया नाल्‍यांची कामे रखडली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

40 फुटी पोकलेन मशीन उपलब्‍ध होत नसल्‍यामुळे छोटया नाल्‍यांची कामे रखडली

Share This
नालेसफाईच्‍या कामावर भाजपा नगरसेवकांनी लक्ष ठेवावे - अॅड आशिष शेलार
मुंबई, दि. 12 मे / प्रतिनिधी - मुंबईत नालेसफाईच्‍या कामांना सुरूवात झाली असली तरी अद्याप कामांना वेग आलेला नाही. त्‍यामुळे आज आपल्‍या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातील नाल्‍यांची पाहणी केल्‍यानंतर मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी भाजपा नगरसेवकांनी आपआपल्‍या विभागातील कामांवर लक्ष ठेवावे अशा सूचना दिल्‍या आहेत. छोटया नाल्‍यांच्‍या सफाईसाठी आवश्‍यक असणारी 40 फुटी पोकलेन मशीन उपलब्‍ध होत नसल्‍यामुळे छोटया नाल्‍यांची कामे रखडली, ही गंभीर बाबही आमदार अॅड अाशिष शेलार यांनी प्रशासनाच्‍या लक्षात आणून दिली.


आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज सकाळी पालिका अधिकारी आणि उपमहापौर अलका केरकर यांच्‍यासह वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातील नाले सफाईच्‍या कामाची पाहणी केली. यावेळी त्‍यांनी मेन एव्‍हयुन्‍यू, नॉर्थ एव्‍हयुन्‍यू, साऊथ एव्‍हयुन्‍यू, पीएनटी, एसएनडीटी या मोठया नाल्‍यांसह विभागातील छोटे नाले व गझदर बांध येथे उभारण्‍यात येत असलेल्‍या पंपिग स्‍टेशनच्‍या कामाची पाहणी केली.

या दौऱयानंतर त्‍यांनी पालिका आयुक्‍त अजोय मेहता यांनी तात्‍कळ पत्र लिहून काही महत्‍वाच्‍या बाबींकडे पालिका आयुक्‍तांचे लक्ष वेधले. यामध्‍ये साऊथ एव्‍हयुन्‍यू पीएनटी या नाल्‍याच्‍या सफाईच्‍या कामाला अद्याप सुरूवात झालेली नाही ती तात्‍काळ करण्‍यात यावी. तसेच गझदर बांध येथे उभारण्‍यात येणाऱया पंपिंग स्‍टेशनच्‍या कामासाठी समुद्राचा प्रवाह अडविणारी बंड वॉल बांधण्‍यात आली आहे. या वॉलला पाथमुख बांधण्‍याचे काम 31 मे पर्यंत पुर्ण करणे अपेक्षीत आहे ते तात्‍काळ पुर्ण करावे नाहीतर नाल्‍यातून येणाऱया पाण्‍याचा निचना होणार नाही व पर्यायाने पाणी आजूबाजूंच्‍या परिसरात घुसण्‍याची शक्‍यता आहे. तसेच नाल्‍याच्‍या संरक्षण भिंतीवर आणि पाथमुखाजवळ काही झोपडया व अतिक्रमणे झाली असल्‍याने पाण्‍याचा निचरा होणार नाही. अशी अतिक्रमणे तात्‍काळ हटविण्‍यात यावीत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages