तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाल्यातील गाळ सेना भाजप नेत्यांच्या घरासमोर टाकतील - सचिन अहिर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाल्यातील गाळ सेना भाजप नेत्यांच्या घरासमोर टाकतील - सचिन अहिर

Share This
मुंबई / प्रतिनिधी - पावसाळा तोंडावर आलेला असताना मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या कामाला अद्याप प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे येत्या पावसात शहरात पाणी तुंबून मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. दोन दिवसात नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेस चेे कार्यकर्ते नाल्यात उतरुन गाळ बाहेर काढतील व महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना भाजपच्या नेत्यांच्या घरासमोर हा गाळ टाकतील, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिला आहे.
 
गेल्यावर्षी अवघ्या एका दिवसाच्या पावसात मुंबई पूर्ण पणे तुंबली होती. यंदा पावसाळा वेळेत येईल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. मात्र शिवसेना व भाजपमधील अंतर्गत वादामुळे मुंबई करांना पुन्हा त्रास सहन करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या दोन दिवसात नालेसफईच्या कामाला प्रारंभ करुन मुंबई करांना दिलासा द्यावा अशी मागणी अहिर यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages