मोबाईल प्लॅनमधूनच ऍप्लिकेशनची खरेदी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोबाईल प्लॅनमधूनच ऍप्लिकेशनची खरेदी

Share This
मुंबई - आपण वापरत असलेल्या पोस्टपेड किंवा प्रीपेड मोबाईल प्लॅनद्वारेच ग्राहकांना ऍप्लिकेशन आणि इंटरनेटवरील माहिती विकत घेण्याचा पर्याय भारतात खुला झाला आहे. आयडिया आणि गुगलने संयुक्तपणे याबाबत घोषणा केली आहे. मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरवर थेट ऍप्लिकेशन, गेम्स आणि चित्रपट खरेदी करणे यामुळे शक्‍य होईल. प्रीपेड किंवा पोस्टपेड प्लॅननुसार पैशांची वसुली केली जाईल.

आयडियाच्या थ्री जी आणि फोर जी ग्राहकांना या नव्या सुविधेचा फायदा होईल. आयडियाच्या भारतभरातील ग्राहकांना या सुविधेचा वापर करणे शक्‍य होईल, अशी माहिती "आयडिया‘चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. लक्ष्मीनारायण यांनी दिली. "डायरेक्‍ट कॅरिअर बिलिंग‘ सेवा सुरू करण्याचा आयडियासोबतचा हा पहिलाच पुढाकार आहे. किमान किमतीत आणि प्रीपेड व्हाउचरद्वारे व्यवहार करणे शक्‍य होईल, अशी माहिती गुगलचे बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे संचालक माईक हेज यांनी दिली. जगभरात स्मार्टफोनबाबत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात अँड्रॉइड उपकरणांना सर्वाधिक पसंती आहे; पण क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांचे प्रमाण मात्र अवघे तीन टक्के आहे. व्यवहारासाठी सोपा पर्याय देतानाच आयडियाच्या ग्राहकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यात येईल, असे गुगलमार्फत स्पष्ट करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages