मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘एअर इंडिया सॅट’च्या सीईओंशी चर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘एअर इंडिया सॅट’च्या सीईओंशी चर्चा

Share This
मुंबई, दि. 5 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एअर इंडिया सॅट कंपनीचे सीईओ मॅच्यू माईक च्यू यांनी आज मंत्रालयात भेट घेतली. यावेळी राज्यात महत्वाच्या विमानतळांवर कार्गो सेवा सुरू करण्यासंदर्भात सविस्तर  चर्चा झाली.


राज्यातील महत्वाच्या विमानतळांवर प्रवाशांना दर्जेदार सुविधा पुरविण्याबरोबरच विमानतळांचा दर्जा सुधारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विमानतळावर अद्ययावत सुविधांची आवश्यकता असून कार्गो सेवा ही आजची महत्वाची गरज असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या भेटीदरम्यान कंपनीचे सीईओ मॅच्यू माईक च्यू यांनी त्यांच्या कंपनीच्यावतीने दिल्या जाणाऱ्या भारतातील विविध विमानतळांवर सोयी-सुविधांबाबत आणि कंपनीच्या नवनवीन उपक्रमांबाबत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचेसमोर सादरीकरण केले. त्यांनी कार्गो सेवेबद्दल अधिक माहिती देऊन कार्गो सेवा महाराष्ट्रातील महत्वाच्या विमान तळांवर सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages