महाराष्ट्राला पुढच्या दोन वर्षांसाठी ‘नीट’ परीक्षेमधून सवलत मिळावी - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्राला पुढच्या दोन वर्षांसाठी ‘नीट’ परीक्षेमधून सवलत मिळावी - मुख्यमंत्री

Share This
नवी दिल्ली, दि. 18 : महाराष्ट्राला पुढच्या दोन वर्षांसाठी नीटपरीक्षेमधून सवलत मिळावीअशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत केली.

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षे’ (नीट) बाबत दिलेल्या निकालामुळे विद्यार्थ्यांना याच वर्षापासून नीट परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. मात्र यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी राज्याला पुढील दोन वर्षांसाठीनीट’ परीक्षेमधून सवलत मिळावी,  या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील विद्यार्थ्यांचे होणा-या नुकसानीबाबत सविस्तर माहिती दिली. यावर पंतप्रधान मोदी यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्री यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

सामायिक प्रेवश परीक्षा (सीईटी) चा अभ्यासक्रम राज्याच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्यामुळे  महाराष्ट्रातील 80 टक्के  विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणे सोयीचे आहे. नीट’ परीक्षेचा अभ्यासक्रम हा केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सी.बी.एस.ई.) च्या अभ्यासक्रमावर आधारित असल्यामुळे राज्यातील शहरी तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना पुढील दोन महिन्यांत होणा-या नीट’ परीक्षेच्या अभ्यास करण्याकरिता अपुरा वेळ आहे. इतक्या कमी कालावधीत नीट’ चा अभ्यासक्रम समजणे विद्यार्थ्यांना कठीण होईल. महाराष्ट्रात सीईटी कायदा पारीत करून खाजगी आणि सरकारी परीक्षा एकत्रच करून घेण्यात आल्या आहेत त्यामुळे अवैध प्रवेशांना आळा बसलेला आहे.राज्य शासनालाही तयारीकरिता दोन वर्षांचा किमान कालावधी मिळावाअशी मागणी फडणवीस यांनी पंतप्रधान यांना बैठकीत केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages