पुण्यात शनिवारी ʽआंबेडकरी जलसाʼ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पुण्यात शनिवारी ʽआंबेडकरी जलसाʼ

Share This
मुंबईदि. 18 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पुणे येथे ʽआंबेडकरी जलसाʼ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दि. २१ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता बी.जे.वैद्यकिय महाविद्यालय मैदान येथे सादर केला जाणार आहे.

यावेळी महाराष्ट्रातील कलाकार उर्मिला धनगरनंदेश उमप,प्रसन्नजीत कोसंबीविजय गटलेवारनागसेन सावदेकरयोगेश चिकटगावकरशाहीर कुणाल वराळे आणि विनायक सैद हे आपली कला सादर करणार आहेत. बुद्धवंदनाआंबेडकरी नमनकीर्तनबतावणी,भारुडपोवाडागोंधळ आणि मूकनाट्य असे कलाप्रकार या भरगच्च कार्यक्रमात सादर होतील.


            
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून कार्यक्रमाची प्रवेशिका १) बालगंधर्व रंगमंदिरजंगली महाराज रोड २) डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाट्यगृहमालधक्कापुणे स्टेशन रोड ३) सावित्रीबाई फुले नाट्यगृह,भवानी पेठ ४) अण्णाभाऊ साठे नाट्यगृहसातारा रोड ५) पं.भीमसेन जोशी नाट्यगृहऔंध ६) यशवंतराव चव्हाण नाट्यगृहकोथरुड येथे उपलब्ध आहेत. या कार्यक्रमास अगत्याने उपस्थित रहावेअसे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages