शिवसेनेने बांधली अत्याधुनिक शौचालये - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिवसेनेने बांधली अत्याधुनिक शौचालये

Share This
टप्प्याटप्प्याने संपुर्ण दिंडोशीत उपक्रम राबविणार
मुंबई,दि.५ (प्रतिनिधी)- मोडकळीस आलेली शौचालये, पुरेसे पाणी नाही, वीजेची सोय नाही, सर्वत्र घाणच घाण... मुंबईतील शौचालयांची ही प्रतिमा शिवसेनेने बदलली आहे... पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोताचा अतिशय खुबीने वापर करत शिवसेनेच्या वतीने दिंडोशीतील झोपडपट्टी परिसरात अत्याधुनिक शौचालये बांधण्यात आली आहेत. शिवसेनेच्या सुर्वणमहोत्सवी वर्षानिमित्त दिंडोशीतील झोपडपट्टी परिसरातील शौचालयांचा कायापालट करून त्याठिकाणी अत्याधुनिक शौचालये नागरिकांना उपलब्ध करुन देण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. टप्प्याटप्प्याने संपुर्ण दिंडोशी परिसरात अत्युधिनिक शौचालये बांधण्यात येणार आहेत.


विभागप्रमुख आमदार सुनिल प्रभु यांनी निवडणुकीत अशाप्रकारची अत्याधुनिक शौचालये बांधून देण्याचे  वचन दिंडोशीतील  नागरिकांना दिले होते. त्यानुसार त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून उषा सदन चाळ, श्री साई निवास चाळ, आनंदवाडी, इंद्र भुवन कुंज विहार चाळ, मास्टर चाळ दत्तवाडी याठिकाणी शौचालय बांधून दिली. मोडकळीस आलेली शौचालये पाडून त्यांचे पुर्नबांधकाम करण्यात आले असून त्यांना आकर्षक लुक देण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी इंग्लीश शौचालये बांधण्यात आली आहेत. विहीर किंवा बोरींगचे पाणी उपलब्ध असल्यामुळे चोवीस तास पाणी मिळणार आहे.अशाचप्रकारे दिंडोशीत ज्याठिकाणी मुंबई महानगरपालिका पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध करून देईल त्याठिकाणी शिवसेना शौचालये बांधून देणार आहे.आनंदवाडी येथे विहीरीतून पाणी उपलब्ध करून देण्यात आहे तर इतर ठिकाणी बोरींगच्या सहाय्याने पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. अत्याधुनिक शौचालये मिळाल्यामुळे येथील रहिवाशांच्या चेहर-यावर आनंद आहे.
नागरिकांचे आरोग्य चांगले राहणारविहीर किंवा बोरींगच्या सहाय्याने शौचालयांना २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंग्लीश शौचालयांमध्ये जेट फ्लश बसविण्यात आले आहेत. त्यामुळे शौचालयांमध्ये स्वच्छता राखली जाईल आणि नागरिकांचे आरोग्य चांगले राहील. तसेच दिवस रात्र वीजही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होणार नाही.
मुंबई महानगरपालिका ज्याठिकाणी विहीर किंवा बोरींग अथवा उपनद्या यांसारखे नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध करून देईल त्याठिकाणी अशाप्रकारची अत्याधुनिक शौचालये बांधण्यात येतील. टप्प्याटप्प्याने संपुर्ण दिंडोशीत हा उपक्रम राबविण्यात येईल. स्थानिक रहिवाशांना स्वच्छ शौचालये मिळतील आणि स्वच्छता राखण्यास मदत होईल
सुनिल प्रभु (विभागप्रमुख आमदार)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages