इंटरनेट नियमावलीसाठी "ट्राय'च्या हालचाली सुरू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

इंटरनेट नियमावलीसाठी "ट्राय'च्या हालचाली सुरू

Share This
मुंबई - देशभरात वापरल्या जाणाऱ्या इंटरनेटसाठी नियमावली निश्‍चित करण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच नेट न्युट्रॅलिटीच्या निमित्ताने बैठकपूर्व प्रबंध प्रकाशित होईल, अशी माहिती ट्रायने स्पष्ट केली आहे. नेट न्युट्रॅलिटी या विषयावर विचारविनिमय करण्याची प्रक्रिया दोन ते तीन दिवसांत सुरू होईल. आठवडाभरात हा प्रबंध जाहीर करण्यात येईल, असे ट्रायकडून सांगण्यात आले आहे. 

इंटरनेटवरील संभाषणाला वेगवेगळे दर आकारण्याच्या मोबाईल कंपन्यांच्या निर्णयावर याआधीच ट्रायने बंधने घातली आहेत. पण "क्‍लोज इलेक्‍ट्रॉनिक कम्युनिकेशन नेटवर्क‘सारख्या काही ठराविक संभाषणांच्या ग्रुपसाठी हे पैसे आकारण्यात येण्याची शक्‍यता आहे. म्हणूनच मोबाईल कंपन्यांसाठी राहून गेलेल्या पळवाटा बुजविण्यासाठी आणखी कडक बंधने आणण्यासाठी ट्रायने या हालचाली सुरू केल्या आहेत. सध्याच्या नेट न्युट्रॅलिटीच्या नियमावलीत इंटरनेटवर आधारित कॉल, मेसेज तसेच इंटरनेट स्पीडवर आधारित बाबींबाबत उल्लेख नाही. अशा नियमावलीनंतर फेसबुकच्या फ्री बेसिक आणि एअरटेल झीरो प्लॅटफॉर्मचा मार्ग बंद होईल, हे स्पष्ट आहे. दूरसंचार कंपन्यांची प्रतिनिधित्व करणारी संस्था सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया आणि एअरटेलने ट्रायकडे या नवीन नियमावलीबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages